
रत्नागिरी विभागातील चिपळूण आगारामध्ये तब्बल 30 सीएनजी बसेस दाखल
पर्यावरण रक्षणासाठी सीएनजी परिवर्तन एसटी बसेस चालवण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आगारामध्ये जुन्याच गाड्या सीएनजीमध्ये परिवर्तन केलेल्या 30 बसेस दाखल झाल्या आहेत.या बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. लवकरच आणखी 50 सीएनजी बसेस रत्नागिरी आगारात येणार आहेत. डिझेल बचतीबरोबरच आता प्रवाशांना आरामदायी प्रवास या सीएनजी बसेसद्वारे होणार आहे.
वाढत्या डिझेल किंमतीमुळे तसेच विविध कारणांमुळे आता एसटी महामंडळ ई-बससेवा, सीएनजीबससेवाकडे अधिक भर देण्यास सुरूवात झाली. रत्नागिरी विभागातील चिपळूण आगारामध्ये तब्बल 30 सीएनजी बसेस दाखल झाल्या. जुन्याच लाल, पांढर्या रंगाच्या एसटीबसेसना सीएनजीमध्ये परिवर्तीत करण्यात आल्या आहेत. या बसेस चिपळूण-रत्न्ाागिरीसह जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली आहे. सीएनजी बसेसची बांधणी माईल्ड स्टीलची असून टाटाच्या नव्या चेसीसवर बांधण्यात आली आहे. या बसेसची क्षमता 44 प्रवासी आहे. या बसेसला पॅनिक बटण, सोयीस्कर हॅण्डल व आरामदायी आसने देण्यात आली आहे. याबसेसमध्ये एअर सस्पेन्शन नसल्यामुळे हादरे बसण्याची शक्यात आहे. प्रायोगिक तत्वावर चिपळुण आगारातून सीएनजी बससेवा सुरू झाली आहे. लवकरच रत्नागिरी आगारात आणखी 50 सीएनजी बसेस येणार आहेत




