
मंत्रीमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका, फडणवीस मोठे आका, -माजी आमदार बच्चू कडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर अडीच वर्षानी दौऱ्यावर गेले हा नेपाळचा परिणाम आहे. मोदी यांना भीती वाटत आहे की आपलं घर जळू नये.स्वतःच्या घरावर वेळ आली तेव्हा मणिपूरची आठवण आली आहे दुसरं काही नाही असा सडडून प्रहार संघटनेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील बच्चू कडून यांनी हल्लाबोल केला. मंत्रीमंडळामधील अर्ध्याहून अधिक मंत्री आका असून देवेंद्र फडणवीस हे मोठे आका आहेत, अशा शब्दात बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला.राज्याच्या मंत्रिमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका आहेत तर फडणवीस मोठे आता आहेत. शेतकऱ्यांनी पिक विमा काढू नये, गुजरातमध्ये या कंपन्या फिरकत सुद्धा नाहीत. पिक विमा कंपन्या फसव्या आहेत असे कडू म्हणाले. या देशामध्ये भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागली आहे. काही मंत्री फक्त पैसे कमवण्यासाठीच मंत्रीपद घेतात, सर्वांचे मोठे आका देवेंद्र फडणवीस आहेत असे कडू म्हणाले.