
पार इज्जत काढली राव! आधी पाकड्यांचा पराभव केला नंतर टीम इंडियाच्या ‘या’ कृतीने सर्वांचे लक्ष वेधले
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याने क्रिकेटप्रेमींना रोमांचक अनुभव दिला. मैदानावर भारताने पाकिस्तानचा मोठा पराभव करत आपला दबदबा सिद्ध केला.पण या विजयानंतर जे काही घडले ते क्रिकेटच्या इतिहासात चर्चेचा विषय बनले आहे. भारताने फक्त सामना जिंकला नाही, तर हस्तांदोलन न करता पाकिस्तानी खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये परत पाठवून एक ‘सायलेंट’ संदेशही दिला.
भारताचा दणदणीत विजय
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला पूर्णपणे निष्प्रभ केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ केवळ १२७ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताने हे लक्ष्य केवळ १७.५ षटकांत आणि तीन गडी गमावून सहज गाठले. कर्णधार सूर्यकुमार यादव भारताच्या या विजयाचा नायक ठरला. त्याने ४७ धावांची दमदार खेळी केली आणि सुफियान मुकीमच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यासोबत शिवम दुबेही नाबाद राहिला.सामना संपल्यानंतर जे दृश्य दिसले ते सर्वांसाठीच धक्कादायक होते. विजयानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी सामना संपताच थेट ड्रेसिंग रूमकडे धाव घेतली आणि सहकाऱ्यांसोबत विजयाचा जल्लोष केला.
त्याचवेळी पाकिस्तानी खेळाडू एकमेकांसोबत हस्तांदोलन करताना दिसले. नाणेफेकीच्या वेळीही सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा अलीशी हस्तांदोलन केले नव्हते, हे विशेष. ही घटना मैदानाबाहेर दोन्ही संघांमधील कटु संबंधांचे संकेत देत होती.
याबाबत पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की पाकिस्तानी खेळाडू हात मिळवण्यास तयार होते. तसेच भारतीय संघाने हात मिळवण्याचे टाळल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने प्रेझेंटेशनसाठी येण्यास नकार दिला.सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात न मिळवण्याबाबत पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. त्याने म्हटले की ‘आपले सरकार आणि बीसीसीआय यांचे एकमत होते. उरलेलं म्हणजे आम्ही इथे आलो आणि निर्णय घेतला. आम्ही इथे फक्त खेळण्यासाठी आलो होतो, बाकी काहीच नाही. मला वाटतं आम्ही त्यांना योग्य उत्तर दिलं आहे.’
‘खिलाडूवृत्तीच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या असतात. आम्ही पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत उभे आहोत. मी आधी म्हटल्याप्रमाणे आम्ही हा विजय आमच्या शूर सैन्यदलाला समर्पित करतो, ज्यांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं.’