जीएसटी सुधारणांमुळे मध्यमवर्गीयांना फायदा होणार


जीएसटी सुधारणांमुळे मध्यमवर्गीयांना फायदा होणार आहे
22 सप्टेंबरपासून जीएसटीचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील. अंदाजानुसार 4 सदस्यीय कुटुंबाला दर महिन्याला 1000 ते 1,800 रुपयांपर्यंत आणि वर्षभरात सुमारे 15 ते 40 हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.खाण्या-पिण्याचा खर्च

धान्य, डाळी, पीठ, तांदूळ आणि इतर खाद्यपदार्थ हे पूर्वी 5% ते 12% कर श्रेणीत होते. आता त्यातील अनेक वस्तू पूर्णपणे करमुक्तझाल्या आहेत, तर काही फक्त 5% श्रेणीत आल्या आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबाचा मासिक खर्च 10,000 रु. असेल तर आधी त्यावर रु. 1,200 कर लागत होता. आता तो फक्त 500 रु. लागेल. म्हणजे दर महिन्याला 700 रु. आणि वर्षभरात 8,400 रुपये बचत होईल. हा घटक सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कारण, तो थेट दैनंदिन स्वयंपाकघराच्या खर्चाशी निगडित आहे
जीएसटी परिषदेने कपडे व बूट यांच्या खरेदीवर मोठा दिलासा दिला आहे. 2,500 रुपयांपर्यंत किंमत असलेल्या कपडे-बुटांवरील करदर 12% वरून कमी करून 5% करण्यात आला आहे. जर यासाठीचा मासिक सरासरी खर्च 3,000 रुपये असेल तर याआधी 360 रुपये कर लागायचा, आता फक्त150 रुपये लागेल. म्हणजे मासिक 210 रुपये आणि वार्षिक 2,520 रुपये इतकी बचत होईल.
वाहन खरेदीच्या बाबतीत मोठा दिलासा मिळाला आहे. छोट्या कारांवरील करदर 28% वरून कमी करून 18% करण्यात आला आहे. 8,00,000 रुपये किमतीच्या कारवर आधी 2,24,000 रुपये कर भरावा लागत होता, आता तो फक्त 1,44,000 रुपये राहील. म्हणजे थेट 80,000 रुपयांची बचत होईल. याशिवाय कारच्या नियमित सर्व्हिसिंग व पार्टस्वरही करदर घटवला आहे. त्यामुळे दर महिन्याला अंदाजे रु. 500 आणि वर्षभरात रु. 6,000 पर्यंत बचत होऊ शकते.
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित अनेक वस्तू करमुक्तझाल्या आहेत. पेन्सिल, रबर, पुस्तके, वही यांवर आता कोणताही कर लागणार नाही. फक्तजियोमेट्री बॉक्स आणि कलर बॉक्सवर 5% कर लागेल. शालेय शिक्षणाशी संबंधित कुटुंबाचा खर्च लक्षात घेतल्यास हा दिलासा महत्त्वाचा आहे.
आरोग्य आणि जीवन विम्यावरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. यामध्ये टर्म लाईफ, युलिप आणि एंडोमेंट प्लॅनचा समावेश होतो. पूर्वी या सर्वांवर 18% कर लागू होता. जर वार्षिक प्रीमियम 45,000 रुपये असेल तर याआधी 8,100 रुपये कर भरावा लागत होता. आता तो शून्य झाला आहे. म्हणजे वार्षिक 8,100 रुपयांची थेट बचत होईल.
आरोग्य खर्चात देखील दिलासा आहे. 33 जीवनरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्तझाली आहेत. थर्मामीटर, ग्लूकोमीटर आणि इतर वैद्यकीय उत्पादनांवर लागणारा कर 12% किंवा 18% वरून कमी करून 5% करण्यात आला आहे. जर मासिक खर्च 2,500 रुपये असेल तर याआधी 450 रुपये कर लागत होता, आता फक्त 125 रुपये लागेल. म्हणजे मासिक 325 रुपये आणि वार्षिक 3,900 रुपयांची बचत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button