
खेड येथे मंदिराचा कळस धुण्यासाठी चढलेल्या तरुणाचा तोल गेल्याने उंचावरून पडून मृत्यू
खेड येथील भरणे रविवारी दुपारी एक दुःखद घटना घडली . श्री देवी काळकाई मंदिराच्या कळसावर स्वच्छतेसाठी चढलेले रमेश बाळा फागे (42, भरणे-फागेवाडी) यांचा तोल गेल्याने ते खाली कोसळले व गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. फागे कुटुंबावर तर जणू दुःखाचा डोंगर कोसळला
काळकाई देवीचा नवरात्रोत्सव अगदी दारात आला असल्याने गावभर स्वच्छतेची लगबग सुरू होती. मंदिर स्वच्छ करण्यासाठी वाडीनिहाय पाळ्या लावण्यात आल्या होत्या. रविवारी फागेवाडी व जाधववाडीची पाळी होती. मंदिराच्या कळसावर चढून स्वच्छतेचे काम सुरू असताना रमेश यांचा पाय अचानक घसरून त्यांचा तोल गेला व ते उंचावरून खाली कोसळणे त्यांना
तातडीने त नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले.