
कुणबी नावाने ओबीसी मध्ये येणाऱ्या मराठा समाजाची घुसखोरी थांबवा
कुणबी नावाने ओबीसी मध्ये येणाऱ्या मराठा समाजाची घुसखोरी थांबवा अशी मागणी करत गुहागर मध्ये हजारो OBC बांधवांनी आज तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. हम सब एक है म्हणत ओबीसी समाज बांधव रस्त्यावर येत आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावरून सरकारचे लक्ष वेधले.मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षाला धक्का लागू देऊ नये तसेच मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी तसेच जातनिहायक जनगणना करण्यात यावी अशा मागण्या देखील ओबीसी बांधवांनी व्यक्त केल्या. गुहागर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून शहरातून निघालेल्या विराट मोर्चात पुरुषांसह महिलांचा सहभाग देखील लक्षणीय ठरला.
पांडुरंग पाते ( ओबीसी समन्वयक समिती अध्यक्ष )