रक्तदान_शिबिर… वर्ष ९ वे

बाबरशेख क्रिडा मंडळ, हातिस आयोजित रक्तदान शिबिर शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी पार पडले.एकूण ३० जण सहभागी झाले होते त्यातील रक्तदान निकषानुसार २३ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाज उपयोगी उपक्रमात भाग घेतला…उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद शाळा, हातिस मुख्याध्यापिका यांनी रक्तदान विषय माहिती जमलेल्या सर्वांना दिली.महेश तोडणकर, रुपेश(बाळू) नागवेकर, अनिकेत ह. नागवेकर, रोहन ठावरे, बंटी नागवेकर, अक्षय अरविंद नागवेकर, पारस आंबुलकर, दिपाली अरविंद रसाळ, मयुर तोडणकर उपस्थित होते.

रक्तदात्यांना मंडळाकडून विशेष भेट देऊन सन्मानित करण्यात आले,यासाठी श्री. अनिकेत सुभाष नागवेकर श्री. राजेश विश्वनाथ नागवेकर श्री. प्रशांत मनोहर नागवेकर यांची मोलाची साथ मिळाली.जिल्हा शासकीय रुग्णालय डॉक्टर आकांक्षा पाचपुते डॉक्टर विनोद जाधव यांजकडून बाबरशेख क्रिडा मंडळाचा सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला… प्रसंगी हातिस ग्रा. वि. मं. हातिस चे माजी अध्यक्ष श्री संदेश नागवेकर, सौ. प्रेरणा सं. नागवेकर, सुमित गोवेकर, सुहास , सुदर्शन, सुयोग, समिल नागवेकर आणि क्रिडा मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते._उपेंद्र अरविंद नागवेकर *कृपया वरील बातमी प्रसिद्धीसाठी घ्यावी*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button