
आता स्थानिक मच्छीमारांसमोर अवैध मासेमारीचं आव्हान
नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला सुरुवात करुन अवघा महिनाभर उलटलेला असतानाच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये इतर राज्यांमधील मच्छीमार बोटींनी प्रवेश केला आहेकायद्यानुसार महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये परदेशी आणि परप्रांतीय जहाजांना मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र राज्याचा हा बंदी कायदा झुगारत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात सारख्या राज्यांमधील शेकडो मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे शिरल्या आहेत. महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी करुन या जहाजांवरुन मच्छीमारी केली जात आहे. परराज्यांमधून आलेल्या 427 हॉर्सपॉवरच्या क्षमतेपर्यंतच्या अनेक मासेमारी करणाऱ्या बोटी मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जयगडच्या हद्दीत मासेमारी करुन लाखो टन मासळी लुटून नेत आहेत. या मासळीची किंमत कोट्यवधी रुपयांची असल्याचं समजतं.महाराष्ट्रामधील मच्छीमार व्यवसाय हा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. मागील महिन्याभरात आलेली वादळं, जोरदार पाऊस, वारे, खराब हवामानामुळे अनेक दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती. त्यातच आता स्थानिक मच्छीमारांसमोर अवैध मासेमारीचं आव्हान उभं राहीलं आहे