
साताऱ्यात मातेच्या कुशीत विसावली चार बाळं;
साताऱ्यातून बातमी समोर आली आहे. एका मातेच्या कुशीत तब्बल चार देवदूत विसावले आहेत.गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डला टक्कर देईल अशी ही घटना जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली आहे.
सातारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी संध्याकाळी एक विलक्षण प्रसंग घडला. कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला आहे. त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या आधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळं…!गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात देवदूतांचा गोड गोंगाट सुरू झाला आहे.




