
समुद्रकिनारी वाहन चालवताना आढळल्यास होणार कठोर कारवाई.
जिल्हा पोलीस दलाकडून समुद्रकिनारी बॅरिकेटिंग*
रत्नागिरी : बाहेरून येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांकडून समुद्रकिनारी वाहन चालविण्याचे आणि स्टंट करण्याचे प्रकार वारंवार घडत असून यातून अनेकदा दुर्घटना घडत आहेत. या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.
समुद्रकिनारी उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात पोलिसांकडून त्या त्या स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने किनाऱ्यावर वाहन देण्यात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. सर्व नागरिकांना तसेच पर्यटकांना समुद्रकिनारी (बीचवर) वाहन चालवण्यास मनाई करण्यात आल्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे. ११ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास दापोली पोलीस ठाणे हद्दीमधील कर्दे येथील समुद्रकिनारी (बीचवर) एक दुर्दैवी घटना घडली.

या घटनेमध्ये महिंद्रा थार या वाहनाचा चालक समुद्रकिनारी (बीच वर) धोकादायक पद्धतीने, अति वेगाने वळणे घेत वाहन चालवत होता. त्यावेळी वाहनावरील त्याचा ताबा सुटल्याने अपघात घडला व वाहन उलटून चालकासह तेथील असणाऱ्या पर्यटकांच्या जिवितास गंभीर धोका निर्माण झाला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध समुद्रकिनारी धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल भा.न्या.सं. २०२३ चे कलम ११०, २८१, १२५ व मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारच्या घटना जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा पोलीस दलाने या संदर्भात पुढाकार घेतला आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व नागरिक व पर्यटकांना सूचना पारित करण्यात आल्या आहेत. त्या अशा : समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारची वाहने नेऊ नयेत अथवा चालवू नयेत. (समुद्रकिनारी वाहन चालवण्यास मनाई.), समुद्रकिनारी वाहन चालविणे धोकादायक असून अपघातास कारणीभूत ठरू शकते, समुद्रकिनारी येणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेस बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी, समुद्रकिनारी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे व अशा प्रकारे कोणी समुद्रकिनारी नियमभंग करून धोकादायक वाहन चालवताना आढळून आल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा डायल ११२ वर कळविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, समुद्रकिनारी वेगाने किंवा निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी पोलीस दलामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस दलाकडून समुद्रकिनारी बॅरिकेटिंग
रत्नागिरी : बाहेरून येणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांकडून समुद्रकिनारी वाहन चालविण्याचे आणि स्टंट करण्याचे प्रकार वारंवार घडत असून यातून अनेकदा दुर्घटना घडत आहेत. या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. समुद्रकिनारी उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात पोलिसांकडून त्या त्या स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने किनाऱ्यावर वाहन देण्यात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. सर्व नागरिकांना तसेच पर्यटकांना समुद्रकिनारी (बीचवर) वाहन चालवण्यास मनाई करण्यात आल्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.
११ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास दापोली पोलीस ठाणे हद्दीमधील कर्दे येथील समुद्रकिनारी (बीचवर) एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेमध्ये महिंद्रा थार या वाहनाचा चालक समुद्रकिनारी (बीच वर) धोकादायक पद्धतीने, अति वेगाने वळणे घेत वाहन चालवत होता. त्यावेळी वाहनावरील त्याचा ताबा सुटल्याने अपघात घडला व वाहन उलटून चालकासह तेथील असणाऱ्या पर्यटकांच्या जिवितास गंभीर धोका निर्माण झाला. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध समुद्रकिनारी धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याबद्दल भा.न्या.सं. २०२३ चे कलम ११०, २८१, १२५ व मोटर वाहन कायदा कलम १८४, १३४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारच्या घटना जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर वारंवार घडत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा पोलीस दलाने या संदर्भात पुढाकार घेतला आहे. याबाबत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व नागरिक व पर्यटकांना सूचना पारित करण्यात आल्या आहेत. त्या अशा : समुद्रकिनारी कोणत्याही प्रकारची वाहने नेऊ नयेत अथवा चालवू नयेत. (समुद्रकिनारी वाहन चालवण्यास मनाई.), समुद्रकिनारी वाहन चालविणे धोकादायक असून अपघातास कारणीभूत ठरू शकते, समुद्रकिनारी येणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेस बाधा पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी, समुद्रकिनारी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे व अशा प्रकारे कोणी समुद्रकिनारी नियमभंग करून धोकादायक वाहन चालवताना आढळून आल्यास आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा डायल ११२ वर कळविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, समुद्रकिनारी वेगाने किंवा निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी पोलीस दलामार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.




