
रत्नागिरी झाडगाव येथील अपार्टमेंटच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला
रत्नागिरी शहरात दुचाकी चोरीचा प्रकार घडला आहे झाडगाव येथील विनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमधून पंधरा हजार रुपये किमतीची ज्युपिटर स्कूटर चोरीला गेली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत शांताराम खरात (वय ६२, रा. विनायक अपार्टमेंट, झाडगाव), हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी आपली पांढऱ्या रंगाची टी.व्ही.एस. ज्युपिटर (क्र. एम.एच.-०८/ए.एल.-१८२२) ही दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. २७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. या कालावधीत, अज्ञात चोरट्याने पार्किंगमध्ये उभी असलेली ही स्कूटर चोरून नेली. . स्कूटर चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर खरात यांनी तात्काळ रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला.




