
नाम फाऊंडेशन दशकपूर्ती सोहळा संपन्न

पुण्यात NAAM Foundation च्या दशकपूर्ती सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमात नाम फाऊंडेशनच्या कार्याचे स्वरूप आणि सामाजिक योगदान ऐकताना मन भरून आले. नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली नाम फाऊंडेशन ने राज्यातील अनेक नद्यांतील गाळ काढण्यापासून ते सामाजिक कल्याणपर कामे करत महाराष्ट्राच्या विविध भागात अमूल्य योगदान दिले आहे. विशेषतः चिपळूणमध्ये पूर काळात गाळ काढण्याच्या कामातून नाम फाऊंडेशन ने सिद्ध केलं की शासन आणि समाजसेवा संस्था कशा मिळून काम करून संकटे दूर करू शकतात.

माझ्या मतदारसंघातील गौतमी नदीसारख्या गाळभरलेल्या नद्यांवर त्यांनी केलेल्या कार्यामुळे जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. नाम फाऊंडेशन ने समाजसेवेच्या क्षेत्रात महाराष्ट्र शासनाबरोबर MOU करून आपले कार्य औपचारिकपणे अधिक मजबूत केले आहे. हे केवळ नाम संस्थेचं यश नाही तर महाराष्ट्राच्या प्रगतीचं यश आहे. आणि आणखी एक अभिमानाची गोष्ट – महाराष्ट्र शासनाने इंग्लंडमधील London मध्ये पहिले वैश्विक मराठी भाषा केंद्र स्थापण्याचा निर्णय नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने घेतला आहे. मराठीचा सन्मान जागतिक स्तरावर नेण्याची ही ऐतिहासिक पाऊलवाट आहे.

नाम फाऊंडेशन आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी असं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या नाम फाऊंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा, असे यावेळी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.






