
गोवा राज्यातून सिंधुदुर्ग मार्गे होत असलेल्या बेकायदेशीर दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांनी धडक कारवाई
गोवा राज्यातून सिंधुदुर्ग मार्गे होत असलेल्या बेकायदेशीर दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पुणे जिल्ह्यातील तिघांना अटक करून तब्बल 16 लाख 15 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कारवाईमध्ये विशाल शिवाजी वाबळे (वय 25, रा. कारखेल, ता. बारामती), गौरव किरण रणधीर (26, रा. वरवंड, ता. दौंड), साहिल अशोक लोंढे (23, रा. हिंगनिगाडा, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. शनिवारी पहाटे 4.30 वा.च्या सुमारास ही कारवाई विलवडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. इनोव्हा क्रिस्टा गाडीतून ही गोवा दारू पुणे येथे नेण्यात येत होती. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता रम, विस्की आदी विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळल्या. बाजारभावानुसार जप्त दारूची किंमत 1 लाख 50 हजार 820 रुपये इतकी असून, गाडी आणि दारूसह एकूण मुद्देमाल 16 लाख 15 हजार 820 रुपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.




