
राजापूर तालुक्यात असलेल्या तिवरे पोस्ट कार्यालयात एका मोठ्या आर्थिक अपहाराचा पर्दाफाश, राजापूर तिवरे येथील पोस्ट मास्तरने १६ ग्राहकांना लाखोंचा घातला गंडा
पोस्ट खात्यावर विश्वास ठेवून अनेक जण त्यामध्ये सुरक्षितेसाठी गुंतवणूक करीत असतात मात्र
राजापूर तालुक्यात असलेल्या तिवरे पोस्ट कार्यालयात एका मोठ्या आर्थिक अपहाराचा पर्दाफाश झाला आहे. पोस्ट मास्तरने तब्बल १६ खातेदारांची ₹ २,२३,५०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिवरे पोस्ट कार्यालयात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असलेल्या अमोल एकनाथ गोतावडे (वय-२९, रा. गोतावडेवाडी) याने ९ ऑगस्ट २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर केला. त्याने ११ खातेदारांच्या बचत खात्यातून काढलेल्या पावत्यांवर बनावट अंगठे आणि सह्या करून ₹ १,५१,००० रक्कम काढून घेतली.
याव्यतिरिक्त, त्याने दोन खातेदार – श्रीमती सत्यवती भानु सुद आणि श्रीमती रुतुजा गणपत तारळ – यांचे नवीन खाते न उघडता त्यांच्याकडून बचत खात्यात ठेवण्यासाठी दिलेले ₹ ४०,००० स्वतःकडे ठेवले. तसेच, श्रीमती शालिनी सहदेव साळवी, श्रीमती सुरेखा सुरेश गुजीर आणि श्रीमती स्वप्नाली अनाजी तरळ या तीन खातेदारांच्या बचत खात्यांमध्ये ₹ ३२,५०० जमा न करता ती रक्कमही स्वतःसाठी वापरली.
अशा प्रकारे, अमोल गोतावडेने एकूण १६ खातेदारांची ₹ २,२३,५०० रुपयांची फसवणूक करून आर्थिक अपहार केला. या घटनेची तक्रार पोस्ट ऑफिस इन्स्पेक्टर श्री. योगेश प्रकाश जाधव यांनी दिली. तक्रारीनंतर, राजापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला. आरोपीकडून अपहार केलेली रक्कम वसूल करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीकडून व्याजासह एकूण ₹ २,४२,००० हस्तगत केले आहेत.