
रत्नागिरी – बाप्पा रील स्पर्धा २०२५ पुरस्कार वितरण समारंभ
रत्नागिरी येथे आयोजित “बाप्पा रील स्पर्धा २०२५” पारितोषिक वितरण समारंभाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोकणच्या संस्कृतीची समृद्धी, गणपती सण, शिमगा उत्सव आणि निसर्गसौंदर्य यांचा आदर करत, मराठी कलात्मक क्षेत्राचा प्रसार करण्यासाठी अथर्वचा प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहे.
वैभव मांगलेच्या संकल्पना आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. मी विशेषतः गौरवाने सांगतो की, महाराष्ट्र सरकारनं मराठी चित्रपटसृष्टीसाठी देशातली पहिली ‘इन्सेंटिव्ह स्कीम’ तयार केली आहे. त्यामुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा येथील निर्माते, कलाकार, टेक्नीशियन यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले व सर्व पुरस्कारप्राप्त कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अभिनेते वैभवजी मांगले, अभिनेत्री वीणाताई जामकर, माजी आमदार राजन साळवी, बंड्याशेठ साळवी, राजेंद्रजी महाडिक, सुदेशजी मयेकर, परशुराम कदम, विजय खेडेकर, शिल्पाताई आदी मान्यवर बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




