
रत्नागिरीत तालशास्त्र कार्यशाळेचे आयोजन
रत्नागिरी : येथील रियाज तबला अकॅडमी आणि नुपुरांगण नृत्यालय यांच्या वतीने रत्नागिरीतील खास कथ्थक शिकणाऱ्यांसाठी “तालशास्त्र कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा २० आणि २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत स्वरनिनाद संगीत विद्यालय, शिवाजी हायस्कूल, शेरेनाका रत्नागिरी येथे होणार आहे.
या कार्यशाळेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ तबलावादक, गुरु, लेखक पं. आमोद दंडगे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये कथ्थक नृत्यप्रकारातील ताल अंगातील सर्व संज्ञांचा सोदाहरण विस्तृत अभ्यास, लय-लयकारी तिहाई बनवण्याचा अभ्यास तीनताल, झपताल, रूपक, एकताल, धमार, रास, पंचमसवारी, गजझम्पा इ. तालात विविध रचना शिकवल्या जाणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी १ हजार ४०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार असून, अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क
केदार लिंगायत (9960035874/8007593709)
आणि सौ. धनश्री नागवेकर-मुरकर (9420154839/ 7776057130) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




