
खेड तालुक्यातील रसाळगड फाटा परिसरात पैशांच्या वादातून तरुणाचे गडावरून अपहरण? पोलिसात तक्रार दाखल
रत्नागिरी जिल्ह्यातही गुन्हेगारी घटनांच्या वाढ होत आहे
*खेड तालुक्यातील रसाळगड फाटा परिसरात पैशांच्या वादातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांच्या कडे दाखल करण्यात आली आहे. ही घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. आरोपींनी पांढऱ्या बोलेरो गाडीतून तरुणाला जबरदस्तीने पळवून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात पुरे बुद्रुक येथील रहिवासी रामचंद्र राजेश पवार (वय ३५) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचा मित्र मधुकर शंकर निकम (वय २६) आणि आरोपी यांच्यात काही काळापासून पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. याच वादातून अपहरणाची ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
१० सप्टेंबर रोजी सायंकाळी रसाळगड फाटा येथे आरोपींनी मधुकर निकम यांना जबरदस्तीने बोलेरोत बसवून नेले. घटनेची माहिती ११ सप्टेंबर रोजी पहाटे ३.०१ वाजता पोलिसांना देण्यात आली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी महेश जरग (रा. उब्रज, ता. पाटण, जि. सातारा) असून त्याचे दोन साथीदार अज्ञात आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे. खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.