
आईच्या खूनप्रकरणी मुलगा अटक
रत्नागिरी : शहरातील शांतीनगर येथे आईचा गळा चिरून खून करून स्वतःच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अनिकेत शशिकांत तेली (वय २५) असे संशयिताचे नाव असून, १० सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
अनिकेत तेली याने २६ ऑगस्टला पहाटेच्या आपली आई पूजा शशिकांत तेली (वय ४५) यांच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला होता. गुन्हा केल्यानंतर अनिकेतने स्वतःच्या दोन्ही हातांच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. १९ दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी दुपारी तो रुग्णालयातून सुटला. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याची अटक नोंदवली आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.




