
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपसंप २३ दिवसांनी मागे, १० मागण्यांना तत्त्वतः मान्यता
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर अखेर मागे घेण्यात आला. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या १३ पैकी १० मागण्यांना तत्त्वतः मान्यता दिली.तसे पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. यामुळे गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला.
१४ मार्च २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी १९ ऑगस्टपासून ‘एनआरएचएम’च्या जिल्ह्यातील सुमारे ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचा मोठा परिणाम जिल्ह्यातील आरोग्यसेवेवर झाला होता. आपल्या मागण्यांसाठी शासनाला जाग यावी, यासाठी ‘एनआरएचएम’च्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातून रॅली काढली होती.




