
रत्नागिरी मनसेच्या शिलेदारांची आंदोलनाची हाक आणी नगरपालिकेने लेखी आश्वासन देत केल्या मागण्या मान्य. जनतेतून समाधान

रत्नागिरी शहरातील खड्ड्या बाबतीत आंदोलन आणी निवेदन करून दमलो पण न. प. प्रशासनास जाग काही केल्या येत नाही म्हणून रत्नागिरी मनसेच्या कामगार सेना जिल्हाचिटणीस महेंद्र गुळेकर अरविंद मालाडकर सचिन शिंदे बाबय भाटकर गौरव चव्हाण आणी महिला आघाडी यांनी जन आंदोलनाची हाक देताच नगरपालिका प्रशासनाने लागोलाग सर्व मागण्या मान्य करत खड्डे डांबराने बुजविण्यास सुरवात केली.
2018 साली मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णय व त्यांनंतर राज्य शासनाने त्याचा बनविलेली अधिसूचनेचा दाखला देत नगरपालिका मध्ये खड्डे बाबतीत तक्रार नोंदणी कक्ष स्थापन करणे बंधनकारक आहे. सदर कक्षामध्ये आलेल्या तक्रारी बाबतीत ताबडतोब कारवाई करु न संबंधित तक्रारदारास तसेच अवगत करावे. दर तीन महिन्यांनी राज्या शासनास खड्डे व त्याबाबत आलेल्या तक्रारी आणी त्यावर केलेली करावाई याचा अहवाल सादर करावा लागतो. यां आदेशाची रत्नागिरी जिल्ह्यात कोठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही किमान जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी नगरपालिका मध्ये याची अंमलबजावणी होऊन तशी तात्काळ करावाई सुरु व्हावी. रत्नागिरी शहरातील खराब रस्ते तात्काळ दुरुस्त करून पावसाळा संपताच नवीन रस्ते बांधणी करावी अशा मागण्या मनसे तर्फे देण्यात आल्या होत्या अन्यथा जनतेसह खड्ड्यामध्ये आंदोलनास सुरुवात करणार असा इशारा देण्यात आला होता.

मनसेच्या मागील आंदोलन व मोर्चा पाहता नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करत मनसेला मागण्या मान्य असून त्यावर तात्काळ कारवाई सुरु करत आहोत असे लेखी पत्र देण्यात आले व ताबडतोब खडी व डांबर टाकून खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. खड्डे बुजविण्यात येत असल्यामुळे सोबतच मनसे मुळे रत्नागिरीच्या जनतेला खड्डे बाबतीत तक्रार देण्यासाठी नगरपालिका मध्ये एक कक्ष देखील उपलब्ध झाल्यामुळे जनतेने मनसेचे आभार मानले आहेत. याप्रसंगी महेंद्र गुळेकर अरविंद मालाडकर सचिन शिंदे बाबय भाटकर गौरव चव्हाण शैलेश मुकादम पप्पू सुर्वे सुश्मिता सुर्वे संपदा राणा गीता गोसावी रुपाली गोसावी इत्यादी उपस्थित होते.




