
मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा २३ रोजी भाजप पक्षप्रवेश
मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह समर्थकांचा लांबीवर पडलेला भाजप पक्षप्रवेश आता २३ सप्टेंबर रोजी मुंबई-नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.
खेडेकर यांच्यासह समर्थकांनी पक्षप्रवेशाची जय्यत तयारी केलेली असताना मराठा-ओबीसी आरक्षण मुद्दा चिघळल्याचे कारण देत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षप्रवेश स्थगित केला होता. यामुळे समर्थकांच्या तयारीवर पाणी फेरले होते. वैभव खेडेकर व त्यांचे समर्थक पक्षप्रवेश तारखेच्या प्रतीक्षेत असतानाच पितृपंधरवड्यामुळे त्यात पुन्हा खोडा पडला आहे. यामुळे पितृपंधरवडा संपताच २३ सप्टेंबर रोजी पक्षप्रवेश होणार आहे.www.konkantoday.com