
चिपळूण शहरालगतच्या कळंबस्ते येथील सदनिकेतून दागिने चोरणारा अट्टल चोरटा अटकेत
चिपळूण शहरालगतच्या कळंबस्ते येथील ज्ञानेश्वरी अपार्टमेंटमधील सदनिका फोडून चोरट्याने तब्बल २ लाख ४५ हजार किंमतीचे दागिने चोरल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी तपासाची चक्रे वेगवान फिरवून मोठ्या शिताफीने सापळा रचून पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या राहत्या घरातून चोरलेले सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले. मनीष अमित नागवेकर (२३, कळंबस्ते) असे चोरट्याचे नाव आहे. कळंबस्ते येथील ज्ञानेश्वरी अपार्टमेंटमधील ही सदनिका अमर लक्ष्मण टोमके (४२) यांच्या मालकीची आहे. गणेशोत्सवासाठी ते सदनिका बंद करून गावी गेले होते.www.konkantoday.com




