
कोकण रेल्वे मार्गावर धावणार २० विशेष साप्ताहिक रेल्वे
रत्नागिरी: :- दसरा-दिवाळी सणाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी २० विशेष साप्ताहिक सेवा जाहीर केल्या आहेत. या विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीदरम्यान कोकण आणि केरळला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या बाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०१४६३ ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर अशी धावणार आहे. दर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता लो. टिळक टर्मिनस येथून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल. या गाडीच्या २५ सप्टेंबर २०२५ ते २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत. एकूण १० सेवा होणार आहेत.
याचबरोबर उलट दिशेच्या फेरीत गाडी क्रमांक ०१४६४ तिरुवनंतपुरम उत्तर ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी दर शनिवारी सायंकाळी ४ वा. २० मिनिटांनी वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी २७ सप्टेंबर २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत. एकूण १० फेऱ्या करणार आहे.
या विशेष गाडीला कोकण आणि दक्षिणेकडील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना याचा फायदा होईल. यात ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, मडगाव, कारवार, मंगळुरु, कासारगोड, कन्ननोर, कालीकट, एर्नाकुलम टाउन आणि कोल्लम या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.




