असोरे येथे गणपती सजावट स्पर्धा आणि शेतकरी नोंदणी शिबिर यशस्वी

असोरे : गुहागर तालुक्यात गाव विकासात आणि सामाजिक पटलावर अग्रेसर असणाऱ्या कुणबीवाडी विकास मंडळ-असोरे (रजि.) कार्यकारणी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा-२०२५” मोठ्या उत्साही आणि आनंदमय वातावरणात पार पडली.
घरगुती गणपती सजावटीच्या माध्यमातून गावात लोकांमध्ये एकोप्याची भावना वाढवणे, सण-उत्सव एकत्रितपणे साजरे करणे, ग्रामस्थ जनतेच्या कलागुणांना वाव देणे, घराघरात उत्साही वातावरण निर्माण होण्याबरोबरच लोकांना पर्यावरण संवर्धनपर जागरूकता निर्माण करणे यावर आधारित ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


गणेश भक्तांनी आपल्या कल्पकतेतून पर्यावरण पूरक सहित्यांचे वापर करून पारंपरिक सजावटिचे कलाकृती साकारत ग्रामस्थ जनतेचे आणि परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या स्पर्धेत एकूण ९२ स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यातून प्रथम पारितोषिक रमेश गोंधळी, द्वितीय पारितोषिक रवींद्र बादावटे आणि तृतीय पारितोषिक योगेश मोरे तसेच प्रथम उत्तेजनार्थ मनीष हुमणे, द्वितीय उत्तेजनार्थ चेतन गोंधळी विजेते म्हणून घोषित करण्यात आले. विजेत्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चंद्रकांत बादावटे आणि दीपक वेलुंडे यांनी काम पाहिले.
स्पर्धेत सहभागी, विजेते तसेच स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणारे सभासद, पदाधिकारी समस्त कार्यकारणी तसेच परीक्षकांचे आणि जेष्ठ कार्यकर्ते यांचे असोरे गाव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दिनेश डिंगणकर यांनी आभार मानले.
स्पर्धेच्या उपक्रमासोबत मंडळातर्फे ग्रामस्थ शेतकऱ्यांसाठी ( Farmer ID) शेतकरी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असोरेत गणपती-गौरी आगमन व गौरी-गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात निर्विघ्न पार पडली. मंडळाच्या वतीने पुढील वर्षीही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचेही श्री. डिंगणकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button