
शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रत्नागिरी येथे ११ वे देहदान…कै. सुप्रिया श्रीपाद कुंटे.

वय – ८० वर्ष. राहणार – नविंद्रनगर, मालगुंड, रत्नागिरी यांचे दिनांक – १०/०९/२०२५ रोजी परकार हॉस्पिटल रत्नागिरी येथे सायंकाळी ७.०० वाजता दरम्याने निधन झाले. त्यांचा मुलगा सुबोध कुंटे यांनी आपल्या आईच्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावा व चांगले डॉक्टर तयार होऊन समाजाची सेवा करावी या सद्भावनेने आपली आई कै. सुप्रिया कुंटे यांचे देहदान शासकिय वैद्यकिय महविद्यालय रत्नागिरी येथे आज रोजी ११/०९/२०२५ रोजी केले. त्यावेळी सागर भिंगारे, रोहित पवार, अमित पाटील, ओमकार खेऊर यांनी सुबोध कुंटे यांना मोलाची साथ दिली.
देहदानाच्या या संपूर्ण प्रक्रीयेमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे , वाहनचालक विनोद मोहिते, सौरभ जाधव, वृंदारक पेजे यांनी काम पाहिले…




