
लांजा शहरात कर्ज देण्याच्या बहाण्याने बनावट टोळी सक्रीय, नाकरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन…
लांजा शहरात काही लोक नागरिकांकडे कर्ज देण्याचा बनावट प्रस्ताव देत फिरत असल्याचा अनुभव समोर आला आहे. त्या घटनेत दोन व्यक्ती नागरिकांच्या घरात किंवा दुकानात जावून हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत कर्ज देवू शकतो आणि दररोज पन्नास रुपये भरणे आवश्यक आहे, असे सांगत होते. त्यांनी स्वतःचा दावा करीत कर्जासाठी कार्ड देण्याची विनंती केली.
या व्यक्ती दुकानधारकांच्या दुकानात येवून कर्ज देण्याची मागणी करत राहिले. मात्र दुकानधारकांनी त्यांना स्पष्ट सांगितले, तुम्ही बाहेरच रहा, मला कर्ज किंवा कार्डाची गरज नाही. मी गरीब आहे आणि माझे उत्पन्न नाही, यावरही आरोपी व्यक्तींनी दबाव टाकला आणि कार्ड घेण्यास सांगितले. त्यांना नाव विचारल्यानंतर त्यांनी स्वतःला अण्णा कर्नाटक अशी ओळख दिली.
दुकानधारकांनी नागरिकांना सावध केले की बँकींग कर्ज मिळविण्यासाठी योग्य कागदपत्रे दिल्यानंतरही, असाच बनावट कर्ज देणार्यांकडून फसवले जावू शकते, या व्यक्ती आधारकार्ड, मोबाईल नंबर, फोटो किंवा बँक खाते रिकामे असल्यासही नागरिकांना धोका निर्माण करू शकतात, असा इशारा दिला. स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com




