
मंडणगड तालुक्यातील टाकवली गावाचा सर्वांसमोर आदर्श, गावातील मुलींची लग्ने एकाच दिवशी वेगवेगळ्या मुहूर्तावर
मंडणगड तालुक्यात एका गावात सामाजिक ऐक्य, एकता टिकविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ मंडळ, मुंबई ग्रामस्थ मंडळ आणि टाकवली महिला मंडळ यांच्या समन्वयातून हिताचे निर्णय घेण्यासाठी महादेव रक्ते यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेत चर्चेअंती गावाच्या हिताचे निर्णय एकमताने मंजूर करण्यात आले. सहकार, श्रमदान व निर्व्यसन या त्रिसूत्रींवर काम करण्याचा संकल्प करणार्या टाकवली येथील ग्रामस्थांनी बदलत्या काळातील अनिष्ट प्रथा सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या चालीरिती मोडीत काढून नव्याने विज्ञानाची कास व अध्यात्माची साथ करत वायफळ होणार्या खर्चाला आळा घालणारे ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांनी घेतले आहेत. या विचारांना तरूणांनी दिलेली साथ महत्वाची ठरली आहे.
यामध्ये लग्न व हळदी समारंभात दारू, मटण बंदी करण्यात आली. अवास्तव खर्च टाळण्यासाठी गावातील मुलींची लग्न एकाच दिवशी वेगवेगळ्या शुभमुहूर्तावर घेण्याचे ठरवण्यात आले.
www.konkantoday.com




