
भाजपा दक्षिण रत्नागिरीची ९० जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर
रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरी भाजपाची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेने घोषित केली. अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना भविष्यात पदाधिकारी करण्यासाठी काही जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची फेरनिवड झाली. आता विस्तारित जंबो कार्यकारिणी श्री. सावंत यांनी जाहीर केली आहे.
पद व नाव या क्रमाने : उपाध्यक्ष- रविंद्र नागरेकर, संदीप नाचणकर, परिमल भोसले, सौ. संगीता जाधव, संजय यादव, प्रशांत डिंगणकर, अभिजीत गुरव. सरचिटणीस- अमित केतकर, सौ. प्रणाली सावर्डेकर, चंद्रकांत मांडवकर. चिटणीस- राजन फाळके, अशोक वाडेकर, राजू भाटलेकर, हेमंत शेट्ये, सौ. स्नेहा मेस्त्री, सौ. संगीता कवितके, रवींद्रनाथ अवसरे. कोषाध्यक्ष – मंदार सरपोतदार. यांच्यासमवेत ६६ जणांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सौ. वर्षा ढेकणे यांची फेरनियुक्ती केली आली आहे. अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष अब्दुल बिजली खान, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश भुरवणे, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. ऐश्वर्या जठार, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सावर्डेकर, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप भिसे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश गुरव आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांची नियुक्ती केली आहे.
संयोजकांची नावे
उत्तर भारतीय आघाडी- मुकेश गुप्ता, आध्यात्मिक आघाडी- अभय चितळे, वैद्यकीय सेल- डॉ. सुजय लेले, मच्छीमार सेल- अभय लाकडे, बुद्धीजीवी सेल- सदानंद भागवत, पदवीधर प्रकोष्ठ- मनोज पाटणकर, सांस्कृतिक आघाडी- हेरंब जोगळेकर, पंचायत राज व ग्रामविकास- भास्कर सुतार, जिल्हा ट्रान्सपोर्ट- नंदकुमार चव्हाण, आयटी सेल- ओंकार फडके, क्रीडा प्रकोष्ठ- दत्ता नार्वेकर, शिक्षक सेल- अभिजीत सप्रे, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल- मुकुंद जोशी, कायदा सेल- ॲड. ऋषिकेश कवितके, दक्षिण भारतीय सेल- विजयकुमार नाडर, भटके विमुक्त जमाती- संतोष केदारी, कामगार आघाडी- राजू मयेकर, सहकार सेल- रत्नदीप देवळेकर, सोशल मिडिया- अमोल गायकर, जैन प्रकोष्ठ- अमित जैन, आयुष्यमान भारत- पुंडलिक पावसकर, बेटी बचाओ बेटी पढाव सेल- सौ. प्राजक्ता रुमडे, गो माता संरक्षण सेल अविनाश गुरव, एनजीओ भगवतसिंह चुंडावत, उद्योग सेल- प्रमोद खेडेकर, उद्योग विकास सेल नित्यानंद दळवी, रेल्वे सेल- शंकर शिंदे, योग सेल- विनोद केतकर, रिक्षा ड्रायव्हर सेल- प्रमोद शिंदे, कोकण विकास सेल- संतोष गांगण, मिडीया सेल- उमेश कुळकर्णी, माजी सैनिक सेल- विलास साळुंखे, अकुशल कामगार सेल- संतोष बोरकर, झोपडपट्टी पुनर्वसन सेल- अशोक वाडेकर, अभियंता सेल- चिन्मय शेट्ये.