
टेरव राधाकृष्णवाडी येथील परेश पांडुरंग काणेकर यांची टेरवची कन्या ही रिक्षा ठरतेय प्रवाशांसाठी आकर्षण
चिपळूण तालुक्यातील टेरव राधाकृष्णवाडी येथील परेश पांडुरंग काणेकर यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला. मात्र, पारंपारिक रिक्षा चालवण्याच्या मार्गाऐवजी, त्यांनी प्रवाशांसाठी काहीतरी वेगळे, उपयुक्त आणि लक्षवेधी करण्याची कल्पना केली. त्यातूनच जन्माला आली टेरवची कन्या अशी रिक्षा जी फक्त प्रवासासाठीच नव्हे तर सेवेसाठी, माहितीसाठी आणि संस्कारांसाठीही ओळखली जाते.
परेश यांनी रिक्षा सजवताना प्रवाशांच्या सोयीचा आणि त्यांच्या सुरक्षिततेचा विचार केला. रिक्षामध्ये प्रथमोपचार पेटी, वर्तमानपत्रे, फ्री वायफाय, मोबाईल चार्जिंगची सुविधा यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी कॉलेजच्या तरूणींसाठी मेकअप सामान असे की कंगवा, खोबरेल तेल, पाडवर, लिपस्टिक, काजळ आणि मोठा आरसा बसवला आहे. त्यामुळे प्रवास करताना प्रवासी आरामदारी आणि सुरक्षित वातावरणात स्वतःची काळजी घेवू शकतात.
परेश यांचा प्रवासातील आत्मीय संवाद आणि प्रवाशांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याची वृत्ती या रिक्षाला आणखी खास बनवते. रिक्षातील स्वामी समर्थ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा प्रवाशांमध्ये संस्कार आणि शिवविचार पेरतात, तसेच चिपळूण शहरातल प्रेक्षणीय स्थळांची माहिती आण त्याचा अंतर प्रवांना शहराची माहिती देण्यासाठी रिक्षात लावली आहे. रिक्षाच्या आतील आणि बाहेरील विद्युत रोषणाई आकर्षक आहे. या रिक्षेमुळे प्रवाशांना फक्त प्रवासाचा अनुभव नाही तर सुरक्षा माहिती, सुविधा आणि सांस्कृतिक शिकवण मिळते. सध्या टेरवची कन्या चिपळूण शहरात प्रवाशांची पसंती मिळवत आहे. सर्व प्रवासी आणि स्थानिक लोक परेश काणेकर यांच्या कल्पकतेचे आणि सेवाभावाचे कौतूक करीत आहेत.www.konkantoday.com