
गेली नऊ वर्षे सेवा केलेल्या अणुऊर्जा प्रकल्पातील १८ सुरक्षारक्षक वार्यावर, माजी सरपंच गिरीष करंगुटकर यांचा आरोप
तत्कालीन स्थितीत तीव्र विरोध असतानाही केवळ रोजीरोटीसाठी जीवाची बाजी लावून जैतापूर अणूउर्जा प्रकल्पासाठ तब्बल ९ वर्षे काम केलेल्या १८ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. या अन्यायाविरूद्ध या सुरक्षारक्षकांनी जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर यांच्यामार्फत आ. किरण सामंत यांची भेट घेवून आपल्याला न्याय मिळावा अशी लेखी निवेदन देवून मागणी केली होती. चार दिवसातच आ. सामंत यांनी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, सहाय्यक कामगार आयुक्त, विविध अधिकारी, अणुउर्जा प्रकल्प अधिकारी व गिरीश करगुटकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली.
यावेळी अणुउर्जा अधिकार्यांची डीजीआर कायद्यामुळे माजी सैनिकांची नियुक्त केल्याचे सांगितले. मात्र प्रायव्हेट इतरही गार्ड घेण्यात आल्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या गार्डना कामावर कसे घेता येईल याबाबत तोडगा काढण्यासाठी गिरीश करगुटकर यांना घेवून अणुउर्जा प्रकल्प अधिकार्यांनी बैठक घेण्याची सूचना पालकमंत्री यांनी अणुउर्जा अधिकार्यांना केली आहे. ही सूचना मान्य करून अणुउर्जा कार्यालयात ही बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीवेळी सर्व सुरक्षा रक्षक उपस्थित होते.
या बैठकीत सहाय्यक कामगार आयुक्त आणि गिरीश करगुटकर यांनी सुरक्षा रक्षकांची बाजू मांडली. सन २०१२ ते २०२१ या ९ वर्ष काळात प्रकल्पाला विरोध असताना केवळ रोजी रोटीसाठी जैतापूर परिसरातील १८ सुरक्षा रक्षकांनी जीवाची बाजी लावत काम केले. मात्र जसाजसा विरोध कमी झाला तेव्हा पुढे एक वर्षाचे नियुक्तीपत्र दिलेले असताना ३१ जानेवारी २०२१ रोजी या सुरक्षा रक्षकांना कंपनीने सिक्युरिटी गार्ड पुरविण्याचा ठेका घेतलेल्या गुरूसिंग पाल यांच्या एजन्सीने तडकाफडकी कमी केले.www.konkantoday.com