
सातारा येथे 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर भरती मेळावाजास्तीत जास्त उमेदवारांनी संधीचा फायदा घ्यावा-जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवींद बिरादार
रत्नागिरी, दि. 10 ):- क्षेत्रीय भरती कार्यालय पुणे यांच्यामार्फत सन 2025-26 करीता जिल्हा क्रीडा स्टेडिअम, सातारा येथे 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागारा अधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवींद बिरादार यांनी केले आहे.
हा मेळावा रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधदुर्ग आणि गोवा राज्यातील उमेदवारांसाठी असून अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




