’वैद्यकीय’मुळे जिल्हा रुग्णालयात रुग्ण संख्या वाढली, पालकमंत्री उदय सामंत


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधासंदर्भात तक्रारी येत होत्या. मात्र वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधांमुळे शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांमध्ये चांगला फरक पडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयात २०२१-२२. या वर्षात बाह्य रुग्णांची संख्या ८९ हजार ८११ इतकी होती. २०२४-२५ – या वर्षात बाह्य रुग्णांची संख्या २ लाख २ हजार ६७७ इतकी झाली आहे. तर मोठ्या शस्त्रक्रियांची संख्या ९८३ वरून आता २ हजार ५९२ इतकी झाली आहे. कुत्र्यांचा चावा तसेच सर्प आणि विंचूदंश यासाठी खासगी रुग्णालयापेक्षा शासकीय रुग्णालयात उपचार घेणार्‍यांची संख्या वाढत असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आता तिसर्‍या वर्षाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरुपी सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची संख्या आता २२ झाली आहे. उ महाराष्ट्रातील एक उत्तम आणि सर्व सोयीसुविधानीयुक्त असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून शहरातील महाविद्यालयाकडे पाहिले जाते. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा हा शैक्षणिक हब म्हणून ओळख मिळवण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रवास सुरू झाला असल्याचे मत सामंत पानी व्यक्त केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button