
प्लॅस्टिकमुक्त मोहिमेसाठी चिपळुणात मार्चपर्यंत मिळणार दरमहा पैठणी
सह्याद्री निसर्ग मित्र, नाटक कपनी चिपळूण यांच्या सहकार्याने नगर परिषदेने आता सप्टेंबर ते मार्च २०२६साठी दुसरी चिपळूण होम मिनिस्टर स्पर्धा जाहीर केली आहे. त्यामुळे विजेत्या महिलेला दरमहा पैठणी मिळणार आहे. तसेच जास्तीत जास्त प्लास्टिक देणार्या व प्लास्टिक मुक्त चिपळूण मोहिमेत महिलांची संख्या वाढवणार्या महिलेलाही बक्षीस दिले जाणार आहे. यावेळी नियमात थोडे बदल करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
नगर परिषद विविध संस्थांच्या माध्यमातून शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने सातत्याने नवनवे उपक्रम राबवत आहे यातूनच अभिनेता ओंकार भोजने याची स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी राबवलेल्या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत ३०१ महिलांनी सहभाग घेतला होता. यातून झालेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत सुदैवी ठसाळे चिपळूणच्या होम मिनिस्टर ठरल्या. तर सर्वाधिक प्लास्टिक जमा करणार्या स्वप्नाली निवाते यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
प्लास्टिक मुक्त चिपळूण मोहीम अधिकाधिक महिलांपर्यंत नेण्यासाठी आता दुसर्यांदा स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. मार्च २०२६पर्यंत तिचा कालावयौ असून यावेळी स्पर्धेत थोडे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या स्पर्धेत २५० ग्रॅम प्लास्टिक दिल्यास कुपन दिले जात होते. मात्र आता हे प्रमाण ५०० ग्रॅम करण्यात आले आहे. किमान ७ कुपन असणार्या महिलेला या स्पर्धेत सहभागी होता येणार असून प्लास्टिक संकलनासाठी सात विभाग तयार करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com