
चिपळुणात मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, चिपळुणात माफीनाम्यानंतर तणाव ओसरला
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावरून वातावरण तापलेले असतानाच एका तरूणाने मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री चिपळूण शहरात घडली. या प्रकाराने आक्रमक झालेल्या शेकडो समाजबांधवांनी मंगळवारी पोलीस स्थानकावर धडक देत तरूणाच्या अटकेची मागणी करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलत दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी या तरूणावर गुन्हा दाखल करून अटक केली.
दरम्यान संबंधित तरूणाने जाहीररित्या मराठा समाजाची माफी मागितल्यानंतर जमाव शांत झाला आणि तणावपूर्व वातावरण निवळले. विशेष म्हणजे पोलिसांनी अतिशय शिताफीने प्रकरण हाताळणल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. मयुर भोजने असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.www.konkantoday.com




