कोकण रेल्वे मार्गावर दसरा, दिवाळीसाठी धावणार एलटीटी-सावंतवाडी स्पेशल.


दसरा व दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने एलटीटी-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल जाहीर केली आहे. ही स्पेशल १७ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी धावेल.
०११७९/०११८० क्रमांकाची एलटीटी-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल १७, २४, ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर रोजी धावेल. दर शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता एलटीटीहून सुटून त्याचदिवशी रात्री ९ वाजता सावंतवाडीला पोहचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून रात्री १०.२० वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी १०.४० वाजता एलटीटीला पोहचेल. ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ थांबे देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button