
आर एच पी फाऊंडेशनमुळे दिव्यांग (पॅराप्लेजिक) कु.मंदार आग्रे याला मिळाली यांत्रिक व्हीलचेअर
कु.मंदार रमेश आग्रे.वय २१ वर्ष.मु.पो.तुळसणी ता.संगमेश्वर जि.रत्नागीरी.शिक्षण १२वी.वडील श्री रमेश सोमाजी आग्रे मजुरीकाम करतात.आई सौ.रेशमी रमेश आग्रे गृहीणी आहे. भाउ गौरव रमेश आग्रे शिक्षण घेतो.मंदार वयाच्या १६ व्या वर्षीपर्यत नॉर्मल होता.२०१९ साली त्याचा स्पायनल कॉर्ड ड्राय पडल्याने अचानक त्याच्यातली ताकद कमी होत गेली.त्याला चालता येणे बंद झाले.त्याला व्हीलचेअर वापरावी लागली.संध्या तो एक वर्षापासुन मुंबईच्या शरण संस्थेत ट्रीटमेंट आणी फिजिओथेरपीसाठी रहातोय.तो वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला वस्तू बनवतो.त्याला स्वत:च स्वत: सर्व आवरता येते पण कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जाणे येणे शक्य होत नाही.
मंदारची एका शिबीरादरम्यान आर एच पी फाउंडेशन रत्नागीरीचे अध्यक्ष श्री सादीक करीम नाकाडे आणी सदस्य श्री.समीर करीम नाकाडेंशी ओळख झाली.व्हीलचेअरवरुन खुप लांब जावुन येणे सहज शक्य नव्हते.त्यासाठी इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी सादिक नाकाडे सरांकडे मागणी केली.
आर एच पी फाउंडेशन रत्नागीरीचे संस्थापक व अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी इम्पॅक्ट गुरू फाऊंडेशन यांच्या साहाय्याने निओ मोशनची इलेक्ट्रिक व्हीलचेअर मंदार आग्रे याला देण्यात आली व मुंबईला झोमॅटो मध्ये डिलिव्हरी चे काम ही मिळवुन देण्यात आले.
या निओमोशन गाडीमुळे त्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होणार आहे.तो पुर्णत: सेल्फ डिपेंडन्ट बनणार आहे.कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जावुन काम करु शकणार आहे.अर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहे.कौटुंबिक परिस्थिती सुधारणार आहे. खुप खुश होता मंदार गाडी मिळाल्यावर.मंदारने आणी त्यांच्या फॅमिली मेंम्बर्सनी आरएचपी फाउंडेशन आणी ईतर सर्वांचेच मनापासुन आभार मानले आहेत.




