
आमदार भास्करशेठ जाधव यांचेकडून चिपळूण अर्बन बँकेचे अभिनंदन
चिपळूण अर्बन को–ऑपरेटिव्ह बँकेला महाराष्ट्र अर्बन को–ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आज बँकेच्या मुख्य कार्यालयात आमदार भास्करशेठ जाधव यांनी भेट देऊन बँकेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
या वेळी आमदार जाधव यांनी चेअरमन मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष रहिमान दलवाई, सर्व संचालक व अधिकारी यांचे विशेष कौतुक केले. चिपळूण अर्बन बँकेने गेल्या काही वर्षांत केलेली प्रगती आणि ग्राहकाभिमुख सेवा लक्षात घेऊन राज्य पातळीवर हा पुरस्कार जाहीर झाल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, श्री. फैसल कास्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




