
अवजड वाहतुकीसाठी त्वरित उपाययोजना करा, आमदार शेखर निकम.
चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील जुना पूल खचल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांहून अधिककाळ गाणे-खडपोली एमआयडीसीतील अवजड वाहतूक पूर्णतः बंद पडली असल्याने उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सोमवारी आमदार शेखर निकम यांनी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्यासह उद्योजक, एमआयडीसी, महावितरणसह बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी संवाद साधून लवकरात लवकर पेढांबे-खडपोली मार्गे अवजड वाहतूक सुरू करण्याच्यादृष्टीने उपाययोजना त्वरित हाती घ्या, अशा सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर १० रोजी पुन्हा प्रांत कार्यालयात सबंधित अधिकार्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.
पिंपळीचा पूल खचल्यानंतर एमआयडीसीसह दसपटीचा संपर्क तुटला. परिणामी वळसा मारुन पेढांबे-खडपोली या पर्यायी मार्गाचा वापर सुरू झाला असला रस्ता अरूंद असल्याने अवजड वाहतूक थांबली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अडीच कोटी रुपये खर्चाच्या पेढांबे-खडपोली या रस्त्याचे साडेपाच मीटरने रूंदीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.www.konkantoday.com




