
चिपळूण-लोटे एमआयडीसीकडे जाणारी जलवाहिनी फुटली, फरशी परिसरात जलवाहिनी फुटून हाहाः कार
सोमवारी रात्री साडनऊच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगचा फरशी परिसर अचानक मोठ्या आवाजाने दणाणून गेला. चिपळूणहून लोटे एमआयडीसीकडे जाणारी मुख्य जलवाहिनी अचानक फुटली आणि प्रचंड कारंजे उडत परिसराला अक्षरशः जलप्रलयाने वेढले. डोळ्याच्या पापण्यांतच लाखो लिटर पाणी रस्त्यावर धावले, दुकानांत शिरले आणि व्यापारी व नागरिकांची झोप उडवून गेले. या धक्कादायक प्रकारामुळे अनेक दुकानातील माल, साहित्य भिजून व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या काही महिन्यात सातत्याने हे प्रकार घडत असल्याने नागरिक व व्यावसायिक यांनी संताप व्यक्त केला आहे. दुकानदार नरेंद्र माळी यांना या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.
www.konkantoday.com




