
संगमेश्वर तालुक्यातील पोचरी फाटा येथून एका शेतकऱ्याची होंडा स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला
संगमेश्वर तालुक्यातील पोचरी फाटा येथून एका शेतकऱ्याची दहा हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे.ही घटना बुधवार, ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी १२.३० च्या दरम्यान खालगाव-जाकादेवी येथील पोचरी फाटा येथे घडली. या मोटारसायकलचा मालक रघुनाथ सखाराम गोताड (रा. खालगाव-जाकादेवी) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एम.एच.०८/एल/२७७९ क्रमांकाची निळ्या रंगाची मोटारसायकल त्यांच्या संमतीशिवाय आणि फसवणुकीच्या इराद्याने चोरून नेण्यात आली.