
भोस्ते घाटात वारंवार अपघात होवूनही प्रशास यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई नाही.
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातून प्रवास सुरक्षित झाला असला तरी घाटातील वळण अपघातांच्या दृष्टीने शापित बनले आहे. घाटातील अवघड वळणावर विशेषतः अवजड वाहनांना घडणार्या अपघातचे सत्र सुरू असतानाही प्रशासन मात्र अजूनही सुस्त आहे. अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्याची तसदी घेतली जात नसल्याने वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. गेल्या ६ महिन्यात ३५ हून अधिक अपघात घडलेले असतानाही प्रशासन नेमके जागे होणार तरी कधी, असा सवालही उपस्थित केला जात आहे.चौपदरीकरणादरम्यान भोस्ते घाटाला प्राधान्यक्रम देण्यात आला. चौपदरीकरणानंतर घाटातील अवजड वळणाला लागलेला शापितचा कलंक पुसला जाईल, अशी बांधण्यात आलेली अटकळ आजमितीस फोल ठरली आहे. घाटातील अवघड वळणावर विशेषतः अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणार्या अपघातांना ब्रेक लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने आजवर केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत. घाटातील संरक्षिक भिंतीवर लावण्यात आलेले टायर, वळणांच्या भागात बसवण्यात आलेले १६ हून अधिक गतिरोधक या उपाययोजना फोल ठरल्या आहेत.www.konkantoday.com




