
पुण्यातील विसर्जन मिरवणुक २३ तासांनंतर देखील सुरू!
पुणे : यंदाची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडई येथून काल सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी मानाचा पहिला कसबा गणपतीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. तब्बल २३ तासांनंतर देखील पुणे शहरातील अलका टॉकीज चौकात विसर्जन मिरवणुक सुरु आहे. अद्यापही असंख्य गणेश मंडळाच्या गणरायाचे विसर्जन होणे बाकी आहे.
तर कालच मानाच्या पाच गणपतीचे ५ वाजून ४० मिनिटांपर्यत विसर्जन करण्यात आले. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे वाजून २५ मिनिटांनी विसर्जन झाले. त्यानंतर टिळक रोड, कुमठेकर रोड वरील डीजे मिरवणुक पाहण्यास नागरिकांनी पाहण्यास पसंती दिली. पण रात्री बारानंतर डीजे बंद झाल्यानंतर अनेक मंडळ आहे त्या जागी थांबले. त्यानंतर सकाळी ६ वाजता डीजे सुरू करून मिरवणुक सुरू झाली असून अलका टॉकीज चौकात लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड या मार्गावरून आलेल्या मिरवणुका मार्गस्थ होत आहे.




