
लायन्स क्लब रत्नागिरीचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या शिक्षकांना दरवर्षी दिला जाणारा लायन्स क्लब रत्नागिरीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षण समिती अध्यक्ष शिल्पा पानवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा विविध विभागातील शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
प्रमुख पुरस्कार विजेते (हेरंब पटवर्धन पुरस्कृत कै. ल. ग. पटवर्धन स्मृती पुरस्कार) प्राथमिक विभाग, सायली दीपक राजवाडे- कै. ल.ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, माध्यमिक विभाग, अनया नैनीश अभ्यंकर- शिर्के प्रशाला, महाविद्यालयीन विभाग, केतनकुमार जगन्नाथ चौधरी-फिशरीज इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कॉलेज यांना देण्यात येणार आहे.
या प्रमुख पुरस्काराव्यतिरिक्त अन्य महत्वपूर्ण पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. कै. अविनाश मोरे स्मृतीप्रित्यर्थ लायन साक्षी धुरी पुरस्कृत अंगणवाडी सेविका स्वाती श्रीकांत पोटफोडे, शिंदेवाडी, बालवाडी शिक्षक विभागात शिल्पा पानवलकर पुरस्कृत कै. राजश्री दत्तात्रय गडकरी स्मृतीप्रित्यर्थ प्रज्ञा पराग सुर्वे, कै. ल. ग. पटवर्धन बालवाडी विभाग, पैंगबरवासी हुसेन खान आनदखान फडनाईक स्मृती पुरस्काराकरिता ऍड. शबाना वस्ता पुरस्कृत डॉ. दबिर इक्बाल पठाण यांना, कै. अलका देव स्मृतीप्रित्यर्थ डॉ. शिवानी पानवलकर पुरस्कृत इंद्रसिंग वळवी यांना देणार आहे.www.konkantoday.com




