
नगरपालिका निवडणुक इच्छुक उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
चिपळूण : परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट चिपळूणच्या वतीने येत्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता, प्रचार धोरण, जनसंपर्क तंत्र, संवादकौशल्य तसेच आधुनिक डिजिटल माध्यमांचा वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
लोकशाही मजबूत होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे उमेदवारांकडे केवळ निवडणूक लढविण्याची तयारी असणे पुरेसे नाही, तर त्यांच्याकडे कायदेशीर माहिती, प्रभावी संवादाची क्षमता आणि समाजाभिमुख दृष्टीकोन असणे गरजेचे आहे. या सर्वांचा समन्वय साधण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
तज्ज्ञ व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनातून उमेदवारांना नामनिर्देशन प्रक्रिया, खर्चाचे पारदर्शक नियोजन, लोकांशी थेट संवाद कसा साधावा, सोशल मीडियाचा विधायक वापर कसा करावा, प्रचार यंत्रणा आणि स्वयंसेवक व्यवस्थापन कसे करावे याची सखोल माहिती दिली जाणार आहे. कार्यशाळेत जबाबदार नेतृत्वगुण आणि मतदारांशी विश्वासार्ह नाते निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाईल.
कार्यशाळा सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी अभिरुची हॉटेल चिपळूण येथे आणि मंगळवार १६ सप्टेंबर २०२५ रोजी अंबर हॉल रत्नागिरी येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली असून सर्व इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/3JD3ouN5aNEqjAR4A या वर नावनोंदणी करावी. तसेच ९१५८१२०१५५ या नंबरवर GPay करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.