
चिपळूण तालुक्यात ३१२ पैकी ११ शाळांनीच लावले सीसीटीव्ही
मुलांच्या सुरक्षेसाठी सरकारने सर्वत्र शाळांची सीसीटीव्ही लावण्याची केलेली सक्ती सपशेल फेल गेली आहे. त्यामुळे सुरक्षेची ही तूट उघडी पडली असेच म्हणावे लागेल. चिपळूण तालुक्यात ३१२ पैकी केवळ ११ शाळांनीच आपल्या परिसरात सीसीटीव्ही लावले, अशी माहिती शिक्षण विभागाला दिली आहे. गावातील शिक्षण व्यवस्था मुलांच्या पटसंख्येमुळे धोक्यात आली असे चित्र आहे. तीन शाळांत तर एक पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. तर केवळ पाच शाळांमध्येच शंभरहून अधिक मुलं शिकत आहेत. शिक्षक दिनानिमित्त ही आकडेवारी झोप उडवणारी असून समाज शिक्षक आणि राज्यकर्ते या सर्वांनी गावातील शिक्षण जगवण्याचा प्रयत्न करायला हवा.
www.konkantoday.com




