
चिपळूण तालुक्यातील तांबेवाडी (बामणोली) येथे विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील तांबेवाडी (बामणोली) येथे विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी साधारण 12.30 च्या सुमारास समोर आली. या घटनेने ऐन गणेशोत्सवात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्यू झालेल्या इसमाचे नाव सुधाकर परशुराम तांबिटकर (वय 48, रा. बामणोली, चिपळूण) अशी झाली आहे. घटनेनंतर तात्काळ ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रयत्न केले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.




