
‘हॉटेल सद्गुरू किचन’ चे भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले.
रत्नागिरी गाडीतळ , फाटक हायस्कूल समोर आज नव्याने हॉटेल सद्गुरू किचन या हॉटेल चे भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले.
यावेळी हॉटेल चे प्रोप्रा. अनुजा रेडीज व अंजली कदम यांनी आपण रत्नागिरी तील खवय्यांसाठी चविष्ठ , घरगुरी पद्धतीचे शाहाकारी मांसाहारी व मत्स्यहारी जेवण तसेच रोज नव नवीन नाश्ता ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहे..तसेच नोकरदार माणसांसाठी टिफिन सुविधा सुद्धा उपलब्ध करून देणार असल्याचे रेडीज व कदम यांनी सांगितले..
यावेळी तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी प्रोप्रा- अनुजा रेडीज व अंजली कदम यांना यांच्या नवीन व्यवसायासाठी खूप शुभेच्छा दिल्या..दादा दळी यांच्या समवेत स्वरूप गांगण, प्रसाद बेर्डे, ऋग्वेद दळी, दर्शन दळी, पूजा गांगण, रिया शेरे, कानावजे अनिश रेडीज आदी उपस्थित होते.




