
सावर्डे येथील सदनिका बुकींगमध्ये २१ लाख रुपयांचा अपहार, एकाविरुद्ध गुन्हा
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील एका कन्स्क्ट्रशनमध्ये २ सदनिका बुकिंगसाठी दिलेल्या २१ लाख रुपयांचा अपहार झाल्याची घटना २०२३ ते २०२५ या कालावधीत घडली. या प्रकरणी मंगळवारी अपहार करणार्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक सखाराम सावर्डेकर (सावर्डे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दिगंबर शंकर सावर्डेकर (सध्या-मुंबई, मूळ-सावर्डे) यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक सावर्डेकर याचे कन्स्क्टशन आहे. दिगंबर सावर्डेकर हे त्याच्या ओळखीचे असल्याने त्यांनी २०२३ रोजी कन्स्क्ट्रशन येथे २ सदनिका बुकींग करायला सांगितल्या होत्या. त्यावर विश्वास ठेवत दीपक सावर्डेकर याने कोणतीही कागदपत्र तयार न करता दिगंबर सावर्डेकर व त्यांची पत्नी शर्मिला सावर्डेकर यांच्याकडून सदनिकेसाठी ४९ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र दीपक सावर्डेकर याने ठरलेल्या मुदतीत २०२५ मध्ये कन्स्क्टशनमधील सदनिका त्यांना दिलीच नाही. तसेच दिगंबर सावर्डेकर यांनी सदनिका बुकिंगसाठी दिलेली २१ लाख रुपयाची रक्कम परत न देता त्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हा प्रकार दिगंबर सावर्डेकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक सावर्डेकर याच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




