
शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत फसवणूक प्रकरणी ’त्या’ पाच जणांना न्यायालयीन कोठडी
खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या ४ कोटी २२ लाख फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने पतसंस्थाध्यक्ष दत्ताराम बाळा बैकर, उपाध्यक्ष सुधाकर रामभाऊ शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया योगेश सुतार यांच्यासह अन्य दोन संचालकांना अटक केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
विनोद वामनराव अंडूस्कर (५४, रा. वर्षा) यांनी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार संशयितांनी शामराव नागरी सहकारी पतसंस्थेच्या रजिस्टर क्र. ४३३ नुसार ३ कोटी ७९ लाख ६० हजार ६०९ रुपयांचे आर्थिक नुकसान व बनावट मुदतठेव पावत्या छापत ४ कोटी २२ लाख ८१ हजार २१ रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यात माजी उपाध्यक्ष शशिकांत नथुराम शिंदे, संचालक सुभाष भिकू शिंदे, दत्ताराम धुमक, बाबाराम केशव तळेकर, दीपक केशव शिंदे, सुरेश कृष्णा पड्याळ, सखाराम सोनू सकपाळ, तुकाराम रामू साबळे, तेजा राजाराम बैकर, रेवती चंद्रकांत खातू, मुरलीधर दत्तात्रय बुरटे, अभिजित रमेश नलावडे (कॅशियर), रुपेश चंद्रकांत गोवळकर (लिपिक) यांचाही समावेश आहे. यातील दोन संचालकांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर ८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे समजते.
www.konkantoday.com