
मुंबई – गोवा महामार्गावर राजापूर, हातीवले येथे ट्रक वर मागून महिंद्रा गाडी आपटली, एकाचा मृत्यू, पाच जण जखमी
मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे आज
मुंबई – गोवा महामार्गावर राजापूर, हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्रा,मराझो कंपनीच्या गाडीने धडक देवून झालेल्या अपघातात एक जण मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. यातील मयत व्यक्तीचे नाव राजेश शेखर नायडू वय ३५ असे आहे
महेंद्रा मराझो ही गाडी क्रमांक एम एच 02,इ झेड 4748 मुंबई, मालाड कडून कणकवली, भिरकोन्ड कडे चालली होती. गाडीमध्ये एकूण सहाजण होते कणकवली येथे नातेवाईकांकडे ते चालले होते. वाटेत त्यांनी चहा, नाष्टा केल्यावर ते पुढे चालले असता राजापूर, हातीवले येथील टोल नाक्यावर सदर गाडी आली असता तेथुन पुढे जात असलेल्या असलेल्या क्रमांक एम एच 10,ए डब्लू 8144 या ट्रकला महेंद्रा मराझो गाडीने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये महेंद्रा मराझो गाडीतील राजेश शेखर नायडू यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू ओढवला. तर अन्य पाच जण जखमी झाले. सर्व जखमीना राजापूर मधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून पुढे त्यांना कणकवलीला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.




